Wednesday 7 December 2016

आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा (मराठी)

. . . अद्वैत तत्त्वज्ञानाबद्दल विश्लेषण करण्यापूर्वी पाश्चिमात्य जडवादी nihilists किंवा हिन्दुत्वामधल्या मध्वाचार्यांच्या द्वैतवादाच्या समर्थकांची एक मूलभूत शंका दूर करावी लागते. "जे दिसतं तेच खरं, बाकी न दिसणारं सर्व काही निरर्थक आहे" असं मानणारे नास्तिक जडवादी आत्म्याच्या अस्तित्वाचा वस्तुनिष्ठ पुरावा मागतात. सगुण भक्तीमधे जास्त विश्वास ठेवणारे मध्वाचार्य द्वैतवादीही अशीच भूमिका घेतात.
. . . आता आत्म्याच्या अस्तित्वाचा वस्तुनिष्ठ पुरावा देणं शक्य आहे का ? आहे. गणितीय परिभाषेमधून आत्मा आणि चैतन्य समीकरणाच्या स्वरूपात मांडता येऊ शकतं. त्यासाठी प्रथम "व्यक्त" जग आणि "अव्यक्त" जग म्हणजे काय ते समजून घ्यायला पाहिजे. व्यक्त जग हे जडवाद्यांचं असतं. इंद्रियगोचर अनुभवातून जे जाणता येतं तेच निखळ वास्तव किंवा अंतिम सत्य ह्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. ह्याउलट अव्यक्त जग हे आत्म्याचं अस्तित्व मानणा-या अद्वैतवाल्यांचं जग असतं. अद्वैतवाल्यांच्या मते जडवादी हे मायेच्या प्रभावाने बद्ध असतात. त्यामुळे मनास येईल ते करायला जडवादी स्वतंत्र नसतात. प्रकृतीचे नियम जडवाद्यांना उल्लंघता येत नाहीत :
 कार्यते हि अवशः कर्मः सर्वः प्रकृतिजैर्गुणैः|
. . . एखादी व्यक्ती ही जडवादी आहे की तत्त्ववादी आहे हे केवळ त्या व्यक्तीने आयुष्यात केलेल्या पर्याय-निवडीवरच अवलंबून असतं असं नाही. तर व्वस्थेच्या उतरंडीवर ती व्यक्ती कुठे आहे ह्यावरही ते अवलंबून असतं. व्यावहारिक जगाचा ह्या सगळ्याशी घनिष्ठ संबंध आहे. तो कसा ते आता पाहूया.
. . . आपल्याला आवडो अथवा न आवडो पण आपण सर्वजण "बळी तो कान पिळी" अशा व्यवस्थेच्या उतरंडीचा हिस्सा असतो. सर्वात बलवान व्यक्ती अत्युच्च स्थानी तर सर्वात दुर्बत व्यक्ती ही नीचतम स्थानावर असते. वरचा मोठा मासा खालच्या माशाला गिळू शकतो. इथे बलवान आणि दुर्बल असणं हे केवळ शारीरिक सामर्थ्यावरच अवलंबून असतं असं नाही. तर व्यवस्थेमधले कितीजण त्या व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारतात ह्याकरही ते अवलंबून असतं. ह्याचाच अर्थ सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीला १००% जनसमर्थन असतं तर सर्वात तळाशी असलेल्या व्यक्तीला ०% जनसमर्थन असतं. जर ही व्यवस्थेची उतरंड व्यक्तींच्या ज्ञानभांडाराशी किंवा कौशल्यांशी सुसंगत असती तर ती तर्कनिष्ठ उतरंड ठरली असती. पण सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीला व्यवस्थेची सर्व संसाधनं उपलब्ध असतात. त्याखालील स्थानांवरील व्यक्तींना मिळणारी संसाधनं क्रमाक्रमाने कमी होत जातात. त्यामुळे गटबाजी आणि वशिलेबाजीला जोर येतो. उच्च स्थानावरील व्यक्ती स्वतःच्या वशिल्याच्या तट्टांना वर खेचून घेतात आणि नको असलेल्या व्यक्तींना खाली ढकलून देतात. त्यासाठी कितीही संसाधनं लागली तरी त्याची फिकीर त्यांना नसते. कारण त्यांना स्वतःच्या खिशातली संसाथनं वापरावी लागत नाहीत तर व्यवस्थेमधली संसाधनं वापरूनच ते व्यवस्थेला "आहे रे" (Haves) आणि "नाही रे" (Have nots) अशा विषमतेकडे ढकलत रहातात. व्यवस्थेच्या तळाशी संसाधनंच नसल्यामुळे दुर्बल आणखी दुर्बल बनत जातो तर उच्च स्थानावरचे बलवान अधिकाधिक बलशाली होत जातात. अशी "बळी तो कान पिळी" ही व्यवस्था "न्याय" किंवा Justice शी सुसंगत नाही. JUSTICE ह्या संकल्पनेचा मूलाधार हा "सामाजिक करार" मधे आढळतो. ह्या कराराचं मूळ उद्दिष्ट हेच आहे की कोणत्याही व्यक्तीकडे बदला घेण्याची किंवा प्रतिकार करण्याची क्षमता नसतांना तिला विनाकारण अन्याय सहन करावा लागू नये. (संदर्भ: प्लेटोच्या "रिपब्लिक" भाग २ मधील ग्लौकन् चं भाषण). दुस-या शब्दांत सांगायचं तर एकूणच व्यवस्था ही संख्याबळाच्या आधारावर समाजातील कोणत्याही व्यक्तीवर "कायमस्वरूपी पराभूत" असा शिक्का मारू शकत नाही.
. . . पण व्यवस्थेच्या उतरंडीवर निरंतर खाली ढकलल्या गेलेल्या, नीचतम स्थानावरच्या  व्यक्तीकडे संसाधनं नसतात आणि त्या व्यक्तीच्या भोवतालच्या प्रत्येकाने स्वतःचा फायदा वाढावा ह्यासाठी त्या तळातल्या व्यक्तीबरोबरची नाळ तोडून टाकलेली असते. अशा परिस्थितीत त्या तळातल्या व्यक्तीने अन्यायाचा प्रतिकार करायचा तरी कसा ?
. . . अशा तळातल्या व्यक्तीकडेही अन्यायाचा प्रतिकार करण्याची क्षमता असावी ह्यासाठीच आपली व्यवस्था मानवी अस्तित्वाचं देह आणि आत्मा असं द्विस्तरीय विश्लेषण करते. उतरंडीच्या वरच्या स्थानांवर असणा-या जडवाद्यांचे देह हे अधिक बलशाली असतात. त्या तुलनेत त्यांचा आत्मा हा प्रभावहीन असतो. प्राचीन कणशास्त्रज्ञ कणाद मुनी ज्या कणविज्ञानाचा अभ्यास करायचे त्या कणविज्ञानानुसार म्हणजेच particle physics प्रमाणे अशा जडवाद्यांना Fermions म्हणून संबोधलं जातं; कारण असे कण हे Dirac-Fermi समीकरणांप्रमाणे वागतात. ह्याउलट उतरंडीच्या तळाजवळ असलेल्या व्यक्तींचे देह हे दुर्बल असतात पण त्यांचा आत्मा हा जास्त प्रभावशाली असतो. कणविज्ञान अशा तत्त्ववाद्यांना Bosons म्हणून संबोधतं. कारण असे तत्त्ववादी कण हे Bose- Einstein समीकरणांनुसार वागतात. ह्या सगळ्यातून असा निष्कर्ष मात्र कुणीही काढू नये की "Ice World किंवा पितृसत्ताक पद्धतीतले कण म्हणजे जडवादी आणि Fire World किंवा मातृसत्ताक पद्धतीतले कण  म्हणजे तत्त्ववादी". तुम्ही व्यक्त जगात रहाणार की अव्यक्त जगात रहाणार हे व्यवस्था/system तुम्हांला किती स्वीकारते किंवा नाकारते ह्यानुसार ठरतं.
. . . आत्मा म्हणजे काय ते गणितीय परिभाषेत जाणून घेतल्यावर आता आपल्याला परमतत्त्व किंवा चैतन्य म्हणजे काय ते गणितीय परिभाषेत समजून घेता येईल. Fermions हे Pauli's exclusion principle नुसार चालतात. पण Bosons ना हे Pauli's exclusion principle लागू होत नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणी Bosons ची घनता किती असावी ह्याला कसलीही मर्यादा नाही. अशा पद्धतीने Bosons चा अखंड विस्तार (expanse) तयार होऊ शकतो. ह्या अखंड विस्तारालाच परमतत्त्व म्हणता येतं.
. . . दुर्बल देहवाल्या Bosons चं नेमकं महत्त्व काय? तर एक Boson हा दोन Fermions मधे प्रक्रिया घडवून त्या दोन्ही Fermions ना neutralise (उदासीन) करू शकतो. म्हणजेच व्यक्त जगातल्या जुगारावर Bosons नियंत्रण ठेऊ शकतात, जुगाराचा परिणाम कोणत्याही दिशेला वळवू शकतात. US elections 2016 मधे हिलरी क्लिंटनचा झालेला पराभव हे त्याचंच एक उदाहरण आहे. अमोरिकन निरीश्वरवाद्यांना विशेषतः nihilist गटाला अजूनही ह्यामागची कारणमीमांसा समजलेली नाही !!!

Tuesday 15 November 2016

पुनर्जन्म आणि परमपद

     अरुण दातेच्या एका गाण्याच्या ओळी आहेत --
अफाट जगती जीवर् जगतन्
दुवे निखळता कोठुन मीलन ?
जीव बिचारा हा तुजवाचून जन्मांमधुनी पिसाट फिरता
भेट घडे का जिवा ?
      ८४ लक्ष योनींच्या फे-याभोवती विणलेला मायेचा पसारा हा किती क्लिष्ट असू शकतो ते ह्या ओळींतून स्पष्ट होतं. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं असं एक स्वतंत्र शरीर असतं. जन्माला आलेला कधी ना कधी मरणार हे उघड आहे. पण केवळ एवढ्यावरच विसंबून राहून "प्रत्येक वादाचा निवाडा हा कुस्ती खेळूनच करायचा - जो जिंकला तो बाजीराव, मेला तो फालतू" असं म्हटलं तर व्यवस्था सुरळीत चालू शकत नाही, एकूणच मालमत्ता निर्मितीचा आणि पर्यायाने विकासाचा वेग मंदावतो. अशी विकास खुंटलेली किंवा ऋण विकासदर असलेली व्यवस्था अश्मयुगाकडे वाटचाल करायला लागते. हे टाळण्यासाठी युद्ध टाळणारी पण system power_balance चं यथार्थ simulation करणारी व्यवस्था बनवावी लागते. पुनर्जन्म आणि ८४ लक्ष योनींचा फेरा मिळून power balance चं नेमकं simulation होतं.
      आता सुरुवातीच्या गाण्यात असलेल्या "जीव" ह्या शब्दाची व्याख्या करूया. एखादी व्यक्ती कशी आहे हे सांगतांना आपण नुसतं "साडेसहा फूट उंची, ८२ किलो वजन, ५६ इंची छाती" एवढंच सांगत नाही. हे त्या व्यक्तीच्या शरीराचं वर्णन झालं. पण हा ओंडा नुसताच दंडबैठका काढणारा अडाणी गडी आहे की त्याच्या कवटीत मठ्ठपणाच्या भुश्याखेरीज थोडं ज्ञानभांडारही आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ह्याचाच अर्थ "प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःच्या देहाखेरीज असं काही असतं की ज्याने त्या व्यक्तीची ओळख स्पष्ट होते". आता ही ओळख त्या व्यक्तीची आहे म्हणजे नक्की कोणाची आहे तर त्या व्यक्तीच्या देहात जो जीव असतो त्या जीवाची असते. इथे वैदिक साहित्यवाल्यांसारखं जीवाला आत्मा किंवा जीवात्मा समजण्याची चूक कराल तर घोटाळा होईल. कारण "एम्.ए., पीएच्.डी. कंसात मराठी" अशी ओळख जीवाचीच असू शकते, अनादि अनंत अशा परमतत्त्वाचा अच्छेद्य भाग असलेल्या आत्म्यासाठी अशी मायेच्या पसा-यातली ओळख असू शकत नाही.
      "जीव" म्हणजे काय हे समजल्यावर मृत्यू आणि पुनर्जन्म म्हणजे काय हे जाणून घेणं सोपं जातं. मनुष्याचं आयुष्य साधारणपणे ८० वर्षांचं धरलं तर ह्याचा अर्थ ८० वर्षांत मनुष्याचा देह एकदाच मरतो. पण ह्या ८० वर्षांमधे मनुष्यदेहात वास्तव्य करून बसलेला जीव आपल्या ८४ लक्ष योनींचे अनेक फेरे पूर्ण करू शकतो. म्हणजेच आज तुमच्या देहात असलेला जीव उद्या तुमच्याऐवजी दुस-या व्यक्तीच्या देहात वास्तव्याला जाईल आणि अन्य कोणा व्यक्तीच्या देहातला जीव तुमच्या देहात वास्तव्य करायला येईल. ह्यालाच जीवांनी देहान्तर केलं असं म्हणता येतं. बोलतांना आपण जसं विषयांतर करतो तसा जीव देहान्तर करतो !
जीवाचा हा देहबदल अनेक कारणांमुळे होऊ शकतो.
पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान्गुणान् |
कारणं गुणसङ्गोsस्य सदसद्योनिजन्मसु|
      काही जीवांना सत्त्वगुण जास्त हवे असतात, काहींना रजोगुण तर काही जीवांना तमोगुणांचं आकर्षण असतं. म्हणजेच प्रत्येक जीव हा सत्त्व, रज आणि तम अशा त्रिगुणांचं किती मिश्रण हाताळू शकतो ह्याला मर्यादा असते. ती मर्यादा जर तुमच्या कर्मांमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणाने ओलांडली गेली तर तो जीव देहान्तर करतो आणि त्याच्या मर्यादेच्या आत असणा-या व्यक्तीच्या देहात वास्तव्यासाठी जातो. आणि अन्य एखाद्या व्यक्तीच्या देहातला जीव तुमच्या देहात वास्तव्यासाठी येतो. सर्वसाधारणपणे व्यक्तीची सत्त्व, रज, तम गुणांची जशी आवड असते त्या आवडीशी सुसंगत असाच जीव त्या त्या व्यक्तीच्या देहात वास्तव्यासाठी येतो. अर्थात दुष्प्रवृत्ती जर तुमच्यावर सतत हल्ला करत असतील तर तुम्हांला सत्त्व गुणाची आवड असली तरी तुमच्या देहात नव्याने वास्तव्यासाठी आलेला, मायेने बद्ध असलेला जीव हा, दुष्प्रवृत्तींनी पाठवलेला असल्यामुळे, तुमच्यामधे तमोगुणांची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत रहातो. अशा परिस्थितीत तुम्हांला जन्म मरणाच्या जास्त फे-यांना तोंड द्यावं लागतं. कारण तुमच्या देहातल्या तमोगुणी बद्ध जीवाला हुसकावून लावण्यासाठी तुम्ही सत्त्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करता, पण दुष्प्रवृत्तींच्या रेट्यामुळे त्यानंतर तुमच्या देहात येणारा बद्ध जीव हा परत तमोगुणीच असू शकतो. हे चक्र बराच काळ अव्याहत चालू रहातं. अशा परिस्थितीतही जेव्हां तुम्ही दुष्प्रवृत्तींविरोधातला लढा जोमाने चालू ठेवता तेव्हां तुमच्या पूर्वजन्मातल्या स्मृती जागृत आहेत असं म्हणता येतं. कारण अनेक जन्म घेऊनही तुमची "सत्याची कास धरून असत्याला विरोध करण्याची प्रवृत्ती" बदललेली नसते. तुमचा हा सत्त्वभारित स्वभाव आणि तुमच्या देहातील बद्ध जीवाची तामसी वृत्ती ह्यातल्या विरोधाभासाचा सामना तुम्ही सदैव करत असता.
      एका जाहिरातीमधे - बहुधा प्लायवूड कंपनीची जाहिरात असेल - दाखवलंय की पंजाबच्या एका सरदारजीचे कुटुंबीय तामिळनाडूतल्या township मधे रस्त्यावरून चालले होते. त्या कुटुंबात ७ - ८ वर्षांचा एक बालसरदारजीही होता. चालता चालता मधेच त्या बालसरदारजीच्या पूर्वजन्माच्या स्मृती जागृत होतात आणि तो रस्त्यावर सगळ्यांच्या पुढे भरभर चालायला लागतो. कुटुंबातल्या बाकिच्यांना कळत नाही काय झालं ते. सगळे जण "अरे थांब, थांब" असं म्हणत त्याच्यामागे धावायला लागतात. तो बालसरदारजी भराभर बरेच गल्लीबोळ बदलून शेवटी एका घरासमोर उभा रहातो आणि खणखणीत आवाजात साद घालतो, "सावित्री..."
      आपल्याला एवढ्या मोठ्याने हाक कोण मारतंय हे बघण्यासाठी घरातून एक पंचाहत्तरीला टेकलेली पांढ-या साडीतली म्हातारी बाहेर येते आणि समोर बघते तर हा बालसरदारजी ! ती त्याला घरात यायला सांगते. हा बालसरदारजी तडक घरात शिरतो आणि एका प्लायवूडच्या आसनावर जाऊन बसतो. त्या म्हातारीला आश्चर्य वाटतं कारण ते आसन काही वर्षांपूर्वी निवर्तलेल्या तिच्या नव-याचं असतं आणि नवरा गेल्यापासून नव-याची स्मृती म्हणून जपलेल्या त्या आसनाचा वापर कोणीच करत नव्हतं. त्यामुळे आश्चर्यचकित झालेली म्हातारी त्या आसनस्थ बालसरदारजीची विचारपूस करायला लागते की "कोण रे बाबा, तू ? कुठून आलास आणि माझं नाव तुला कसं कळलं ?" आणि थोड्याच वेळात त्या म्हातारीच्या लक्षात येतं की काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या आपल्या नव-यानेच ह्या बालसरदारजीच्या रूपात पुन्हां जन्म घेतला आहे आणि एकदम ती "स्वामी" असं म्हणून त्या बालसरदारजीचे पाय धरते !
      आता 'बालसरदारजीच्या पूर्वजन्मातल्या स्मृती जागृत होणं' ह्या घटनेमधे किती महान काव्य दडलेलं आहे हे सांगण्यासाठी कोण्या "एम्.ए., पीएच्. डी. कंसात मराठी" अशी बिरुदावली धारण करणा-या बुद्धिजीवीची गरज तुम्हांला भासणार नाही, पण महत्त्वाचा मुद्दा असा की 'गतजन्मातल्या स्मृती' अशा विषयांवरचे अनुभव वाचतांना, ऐकतांना 'देह - जीव - पुनर्जन्माचा फेरा' ह्याबाबतचं ह्या पाठातलं सुरुवातीचं विश्लेषण ध्यानात घेतलं पाहिजे.
      तर ह्या बालसरदारजीच्या कथानकाच्या अगोदर म्हटल्याप्रमाणे दुष्प्रवृत्तींविरोधात लढतांना तुमचा सत्त्वभावित स्वभाव आणि तुमच्या देहात वास्तव्य करून असणा-या बद्ध जीवाची तामसी वृत्ती ह्यांच्यातल्या विरोधाभासाचा सामना तुम्ही सदैव करत असता. मग ह्यावर काही उपाय नाही का ? उपाय आहे. स्वतः भगवंतांनीच तो सांगून ठेवलेला आहे :
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् |
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः |
      भगवंतांच्या निकट राहिलात की तुमच्या देहातला जीव हा तुमचा देह सोडून दुस-या देहात जाण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजेच तुमच्यासाठी (तुमच्या देहातील जीवासाठी) पुनर्जन्म नसतो. म्हणजेच पर्यायाने तुमचा जन्म मरणाचा फेरा टळतो आणि तुमच्या अस्तित्वाला एक प्रकारचं स्थैर्य येतं. भगवंतांशी एकरूप झालात की तुमच्या देहात वास्तव्य करणारा जीव हासुद्धा भगवंतांशी तादात्म्य पावलेलाच असतो. त्यामुळे तो जीव कोणत्याही योनीतला असला तरी तुमचा स्वभाव आणि त्या जीवाची वृत्ती ह्यामधे विरोधाभास रहात नाही. कारण तुम्ही भगवंतांच्या निकट असल्यामुळे तो जीव तुमची वृत्ती प्रभावित करू शकत नाही तर तुमच्या सत्त्वभारित स्वभावामुळे तो जीवच प्रभावित होतो आणि मायेच्या पसा-यातून मुक्त होतो. म्हणजेच असा जीव मायेने बद्ध रहात नाही.
      तुमचा देह अधिक देहातील जीव मिळून तुमचं जे अस्तित्व बनतं ते संपूर्ण अस्तित्व जर भगवंतांच्या परमधामाजवळ असेल (म्हणजेच जर तुमचं पूर्ण अस्तित्व भगवंतांशी एकरूप झालं असेल) तर तुम्ही परमपदावर पोचलेले आहात असं म्हणता येतं. परमपदापर्यंत पोहोचण्यामधे प्रमुख अडसर म्हणजे "तुमचं मुक्तसङ्ग अवस्थेत नसणं". जगात बहुतांश जणं ही ह्या ना त्या पद्धतीने उर्वरित समाजाशी जोडलेली असतात. समाजव्यवस्थेच्या उतररंडीवर ( hierarchy वर) तुमच्या खाली कोणीतरी असतं तसंच तुमच्या वर कोणीतरी असतं. पर्यायाने तुम्ही कोणाला ना कोणाला तरी उत्तरदायी असताच ! तुमचं वैयक्तिक जीवन आणि एकूण समाजव्यवस्था सुरळीत चालू रहाण्यासाठी भले ही व्यवस्था उपयुक्त असेल पण अशा व्यवस्थेत राहून तुम्हांला परमपदापर्यंत पोचता येणार नाही. You cannot realise God, unless you are FREE. आता तुमचं वैयक्तिक जीवन आणि एकूण समाजव्यवस्था जर सुरळीत चालू असेल तर परमपदाकडे जायचा खटाटोप करायचाच कशाला ? ह्याचं उत्तर असं आहे की समाजव्यवस्था सुरळीत चालू आहे म्हणजे सर्व काही योग्य त-हेने चालू आहे असं नाही; फक्त सरळसरळ आंदोलनं, मारामा-या, युद्धं चालू नाहीत एवढंच. शोषितांचा आवाज पूर्णपणे दडपून टाकला तरीसुद्धा अशी चमत्कारिक शांतता अनुभवायला मिळते. Summer Time Holiday सारख्या हॉलिवूड चित्रपटांमधे अशीच भयावह शांतता वेगळ्या संदर्भात चित्रीत केली आहे. आणि तुमचं व्यक्तिगत जीवन आज सुरळीत चालू आहे पण उद्याही ते तसंच चालू राहील असं तुम्ही छातीठोकपणे सांगू शकाल का ? जर सांगू शकत असाल तर रहा आहात तिथेच, परमपदाकडे जाण्याची तुम्हांला गरज नाही. पण साधारणपणे आयुष्य इतकं सरळधोपट नसतं. मायेच्या पसा-यात फिरतांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, भवसागर पार करतांना मधेच गटांगळ्या खायची वेळ येते. अनेकदा जगातली प्रत्येक गोष्ट नश्वर, अस्थायी असल्यासारखं वाटतं. अशा वेळेस तुम्हांला काही शाश्वत आधाराची गरज भासते, परमेश्वराचं स्वरूप नक्की कसं आहे ते समजून घ्यावसं वाटतं. तुम्हांला नेमकी दिशा दाखवणारा कोणीही तुमच्या आजूबाजूला दिसत नाही. सगळे नुसतीच पोपटपंची करणारे खुशालचेंडू वाटतात. मनाच्या अशा संभ्रमित, अशांत अवस्थेत असाल तरच तुम्हांला परमपदापर्यंत जाऊन गूढ प्रश्नांची उकल करून घ्यावीशी वाटते, ह्या अनित्य, अशाश्वत जगापेक्षा काही शाश्वत, चिरस्थायी आहे का ते शोधण्याची ओढ लागते.
      तर आता परमपदाकडे जायचं हे नक्की ठरल्यावर प्रश्न येतो तो म्हणजे परमपदाकडे जाण्यासाठी नक्की काय करायचं ? दिल्लीला जायचं तर राजधानी एक्स्प्रेस आहे, इंग्लंड अमेरिकेत जायचं तर विमानं आहेत, लक्झरी क्रूझेस् आहेत. पण परमपदाकडे जायचं तर कोणत्या रस्त्याने जायचं ? परमपद मिळवणं म्हणजे भगवंतांचं निरंतर सान्निध्य मिळवणं. त्यासाठी भगवंतांचं परमधाम कुठे आहे ते आधी समजून घेतलं पाहिजे.
अव्यक्तोSक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् |
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम् |
      मायेच्या पसा-याचे व्यक्त आणि अव्यक्त असे दोन भाग केले तर त्या अव्यक्ताहूनही अव्यक्त असं चिरंतन तत्त्व चराचराला व्यापून राहिलेलं असतं. त्या परम अव्यक्ताला अक्षर जगत् असं म्हणतात. त्या अक्षर जगतातलं असं स्थान की, जिथे पोचल्यावर परत मायेच्या पसा-याकडे फिरकावं लागत नाही, तेच भगवंतांचं परमधाम आहे. त्या परमधामापर्यंत जाऊन भगवंतांबरोबर एकरूप झालं की मनुष्य परमगतीला प्राप्त होतो म्हणजेच असा मनुष्य परमपदावर विराजमान होतो.
      आता कोणत्या ठिकाणी जायचं आहे ते नक्की झाल्यावर पुढचा प्रश्न म्हणजे तिथे जाण्यासाठी काही गाडीघोड्याची सोय आहे की असंच पायीपायी वाळवंट तुडवत मुक्कामी जायचं ? भगवंतांनी ह्यावर एक सरळ सोपा उपाय सांगितला आहे. ध्यानधारणेमधे एका विशिष्ट प्रक्रियेतून गेलं की अक्षर जगतात आणि तिथून पुढे थेट भगवंतांच्या परमधामाकडे जाता येतं :
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च |
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् |
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् |
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् |
       इथे परत लक्षात घ्यायची गोष्ट ही की "देहत्याग" म्हणजे तुमच्या शरीराचा अन्त नव्हे तर "देहत्याग" म्हणजे तुमच्या देहात वास्तव्य करून बसलेला जीव तुमच्या देहाचा त्याग करून दुस-याच्या देहात प्रवेश करतो आणि भगवंतांशी एकरूप झालेला जीव तुमच्या देहात वास्तव्यासाठी येतो…

Sunday 30 October 2016

आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा

. . . . . While extending this theological topic related to "अद्वैत" philosophy, nihilists may ask for objective evidence for the existence of soul. Is it possible to give objective evidence for existence of soul ? Yes, it is possible to give such evidence mathematically. For that one must understand the terms "व्यक्त" ("vyakt" i.e. something tangible through sensory perception) & "अव्यक्त" ("a_vyakt" i.e., something which is to be cognized through logic or mathematics). By taking an oversimplified example, more light can be thrown upon this " vyakt" & "a_vyakt" differentiation. What we say in public need not be our choice. e.g., in public I may say "I don't like Donald Trump", but while voting I can do exactly opposite. So, we can say my public view is "व्यक्त" mode activity whereas my actual vote is my "अव्यक्त" mode activity. Point to remember is : philosophically, "a_vyakt" mode is somewhat more complex to understand.
. . . . . Now, whether we like it or not, we live in a system in which people are organized by some sort of a "pecking order" - strongest person at the top & weakest person at the bottom. Here, strength is usually considered to be in proportion to your acceptability or to number of persons supporting you. That means topmost person has support from 100% population & 0% opposition; whereas bottommost person has 0% support & 100% opposition. Had this"pecking order" been in proportion to knowledge levels/ skill levels of persons, it would have been a logical order. But because topmost person has maximum access to system resources, lobbying & favouritism creeps in thereby distorting everything. Established conmen place their favoured population at the top & unwanted population gets slandered-down. Because there are no resources at the bottom, weak becomes weaker & strong at the top becomes stronger. This is not in line with concept of JUSTICE, which has origin in social contracts aimed at preventing a person from suffering injustice without proportionate ability to take revenge (Ref. Glaucon's speech BookII Republic - Plato). In other words, you cannot pre-programme a person to be all-time loser. But how can a person at the bottom, who doesn't have access to system resources & who is rejected by people around him for maximising their profits, take revenge against established tyrants ? In order to empower such downtrodden persons with ability to take revenge, system uses this concept of dividing a person's existence into two parts - body & soul. Persons at the top can be considered to have stronger body-component & weak soul-component; whereas persons at the bottom can be considered to have weaker body-component & strong soul component. Particle physics calls persons at the top as equivalents of Fermions which follow Dirac-Fermi equations; whereas persons at the bottom are considered as equivalents of Bosons which follow Bose-Einstein equations. Fermions are part of "व्यक्त" world; whereas Bosons are part of "अव्यक्त" world.
. . . . . Here, the point to remember is : Everyone from Ice world system ( US Republicans?) is NOT to be mistaken for Fermion & everyone from Fire world system (US Democrats?) is NOT to be mistaken for Boson.
. . . . . In other words, not everyone, from society linked to STANFORD UNIVERSITY, is Boson. Fire world members are not as much rejected by the system as they claim...
. . . . . This distinction between Boson & non-Boson is important especially when you are trying to cognize "omnipresent consciousness". Bosons are not constrained by Paul's exclusion principle and as such there's no theoretical limit on spatial density (number per volume). Therefore Bosons can form a smooth continuum which, philosophically, can be referred to as omnipresent consciousness.
. . . . . Proper analysis of Bosons gives plenty of insight into all_pervading_consciousness. Then only we understand why mere public opinion should NOT be mistaken for all_pervading_consciousness. Since Bosons are mainly force carriers, they act as mediators thereby effecting interactions between any two Fermions. This is a powerful feature of Bosons because it has the potential to alter the deals taking place between two Fermions. It can even decide the outcome of a race taking place between two Fermions...!

Thursday 8 September 2016

परमपदानंतर काय ?

परमपदानंतर काय ?
भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायात अश्वत्थ वृक्षाचं वर्णन करतांना भगवान म्हणतात :
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् | 
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् |
वेद आणि उपनिषदवाले म्हणूनच भगवंतांवर खार खाऊन असतात. कारण वरच्या श्लोकात वेदांना अश्वत्थ वृक्षाची पानं म्हणून संबोधलं आहे आणि आद्य पुरुष वृक्षाच्या मुळापाशी आहे असं म्हटलं आहे. आता अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या आणि पानं ही मायारूपी पसा-याच्या प्रमाणात वाढतात : 
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः | 
म्हणजेच वेद आणि उपनिषदं ही मायेच्या पसा-याचं वर्णन करतात, मायेच्या पसा-यातून बाहेर कसं पडायचं ते सांगत नाहीत. त्यासाठी वेदांत रेषेच्या पलिकडे जाऊन योगसाधनेद्वारा परमपवित्र निर्गुणाबरोबर एकरूप व्हावं लागतं : 
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन | 
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो नित्ययोगस्थः आत्मवान् | 
. . . पण एवढं सगळं करण्याची इच्छा आणि क्षमता ह्या मुंडनवाल्या खुशालचेंडूंकडे नाही. अरे, नुसती मस्तकावरची केसं कापून कुठच्याही अस्वलाचा बृहस्पती होतो का काय ? त्यासाठी अथक परिश्रम करत काट्याकुट्यांनी भरलेल्या योगसाधनेच्या मार्गावर वाटचाल करावी लागते : 
 क्लेशोsधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसाम् | 
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते | 
"भगवंत म्हणजे सर्वात श्रेष्ठ व्यक्त पुरुष" अशा बिनबुडाच्या व्याख्या करणा-या मुंडनवाल्या अस्वलांना "अव्यक्त" हा शब्द लिहिता वाचता तरी येतो काय ? आपल्या विरोधात जाणा-या प्रत्येकाला "पाखंडी" म्हणत बसण्यापेक्षा स्वतःच्या वैदिक साहित्यातला भोंगळटपणा कमी केला असतात तर मुंडनवाल्या गावंढळांवर आज अशी भादरून घ्यायची वेळ आली नसती ! नको तिथे लई केसं वाढली ह्या वेदवाल्यांच्या अंगावर : नाकात केसं, कानात केसं, पाठीवर केसं, छातीवर केसं, बेंबीवर केसं. आता फक्त एका विविक्षित इंद्रियावर केसं फुटायची तेवढी बाकी आहेत म्हणजे मग समोर म्हैस आणा नाहीतर अप्सरा - एक ठोका मारला की आनंदाचे डोही आनंद तरंग ! असो.
. . . तर अव्यक्ताची उपासना ही क्लेशकारक असते आणि मुंडनवाल्या खुशालचेंडूंना तर बूड न हलवता नुसती पोपटपंची करून निवांत आयुष्य घालवायचं आहे. मग ह्यावर त्या रिकामटेकड्यांनी उपाय काय शोधला तर "स्वत:ला ईश्वर समजणा-या वंशवादी भुक्कडांचं बिनदिक्कत लांगूलचालन करायचं" ! आता वंशवाद्यांच्या कवट्यांमधे अहंकाराचा किती भुसा भरलेला आहे पहा : 
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि |  
ईश्वरोsहमहं भोगी सिद्धोsहं बलवान्सुखी |
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् | 
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् | 
. . . अहो, ह्या वंशवाद्यांच्या भुक्कडगिरीचं संपूर्ण वर्णन कसं काय करणार ? हिमालयाच्या आसनावर, सप्तसिंधू भरतील एवढी शाई घेऊन साक्षात् सरस्वती महावृक्षांच्या फांद्यांची लेखणी करून अहोरात्र लिहीत बसली तरी ह्या वंशवाद्यांच्या कवट्यांमधल्या भुक्कडगिरीच्या भुश्याचं समग्र वर्णन करणं तिला जमणार नाही. 
. . . असे हे महान वंशवादी म्हणजे नक्की कोण तर संपूर्ण पृथ्वीतलावर आपल्या जनुकांइतके उत्तम जनुक (genes) कोणाचेही नाहीत असं समजणारे genius मठ्ठोबा ! अरे, हिटलरचे रणगाडे बघून पळत सुटणारी खुळसटं तुम्ही. गर्दभाच्या पिपाणीत घालून वाजवतो तुमचं जनुक औत्तम़्य (gene superiority) ! उगाच भृकट्या वर कशाला नेताय ? "दुर्बल" शब्दावरून "दौर्बल्य" शब्द बनतो तसा "उत्तम" शब्दावरून "औत्तम्य" ! ह्यालाच शुद्ध मराठीमधे "बुद्धिजीवीगिरी", साध्या इंग्रजीमधे intellectual snobbery आणि अतिशुद्ध इंग्रजीमधे intellectualism असं म्हणतात. आणि वर अशी बुद्धिजीवीगिरी करायला सोकावलेले पोपट आम्हांला काय सांगतात की "तुमची भाषा फार कठोर आहे. तिला लय नाही, ताल नाही, माधुर्य नाही, मायेचा ओलावा नाही." अरे ओलाव्याच्या, कडंकडंनं घरला जा. बेवड्याला "मद्यपी" म्हटलंत तर त्याला आपला सन्मान झाल्यासारखा वाटतो, एखाद्या अक्करमाशाला नुसतं "दुष्कृतीन्" म्हणून संबोधलंत तर त्याला वाटतं "सौजन्यमूर्ती" म्हणून आपला सन्मानच होतोय. समोरच्याला जी भाषा समजते ती वापरायची की ह्या "एम.ए., पीएच्.डी कंसात मराठी" वाल्यांना रुचेल ती भाषा वापरायची ? असो.
. . . तर ही अव्यक्ताची क्लेशकारक उपासना टाळण्यासाठी वंशवाद्याच्या वळचणीला गेलेले गावंढळ मुंडनवाले काय अकलेचे तारे तोडतात तर म्हणे, "भगवद्गीतेत सांगितलेला अश्वत्थ वृक्ष हा वैकुंठरूपी वृक्षाचं असत् प्रतिबिंब आहे..." वा रे वा ! अशा ह्या अलौकिक विद्वत्तेपुढे आम्ही पामरांनी काय भाष्य करावं ? आता एकदा संपूर्ण भगवद्गीता हेच अतिशुद्ध अध्यात्मिक जगताचं असत् प्रतिबिंब आहे असं जाहीर करून टाका म्हणजे ब्रह्मराक्षसाला ब्रह्मदेव आणि Devil ला भगवान म्हणायला मोकळे हे गावठाण विभागातून आलेले मुंडनवाले ! तुमचं नशीब चांगलं म्हणून आमच्याकडचा अपशब्दांचा साठा संपला अन्यथा तुमच्या प्रपितामहांचीसुद्धा भादरून काढली असती एव्हांना.
ह्यावर आता 'आम्ही' म्हणजे कोण हे विचारू नका. प्रस्तुत लेखकाने स्वतःसाठी वापरलेलं आदरार्थी बहुवचन आहे ते... असो.
. . . देहधारी मनुष्य परमपदापर्यंत जाऊन भगवंतांचं स्वरूप जाणू शकेल का ? परमपदापर्यंत पोहोचणं हे ब-याच जणांना सोपं वाटतं पण त्या पदापर्यंत गेल्यानंतरही भगवंतांचं विराट स्वरूप त्यांना समजत नाही. त्यामुळे त्यांना "परमपद" हा अध्यात्मिक विनोद वाटतो. मुळात भगवंतांचं स्वरूप पूर्णार्थाने जाणणं म्हणजे नक्की काय ? "समस्त जनतेचं एखाद्या विषयावरचं सामूहिक मत म्हणजेच त्या विषयाबाबतची सर्वव्यापी परमेश्वराची इच्छा" अशी निरीश्वरवाद्यांसारखी भूमिका घेऊन काहीच साध्य होत नाही. कारण अशी भूमिका झुडशाहीला (Ochlocracy ला) कधीही विरोध करू शकत नाही. झुंडशाहीतून तयार होणारं सार्वमत म्हणजे ईश्वरेच्छा असा एकदा ग्रह करून घेतलात की आनुषंगिक तर्कानुपाताने तुम्ही "असत्य म्हणजे सत्य", "ब्रह्मराक्षस म्हणजे ब्रह्मदेव" अशी मांडायला सोपी पण पूर्णतया आधारहीन विधानं (specious arguments) करत रहाल.
. . . झुंडशाहीवाल्या ठकसेनांनी जर सार्वमत हवं तसं झुकवून आमच्यावर "फालतू मनुष्य" असा शिक्का मारला तर "हीच ईश्वरेच्छा" असं म्हणत ते दिशाहीन अंधांचं सार्वमत आम्ही शिरोधार्य मानायचं का काय ? आमच्यासारख्या उमद्या घोड्याला डावलून स्वतःच्या गटातल्या वशिल्याच्या गाढवांची "अरबी घोडे" म्हणून कितीही प्रसिद्धी केलीत तरी प्रत्यक्ष शर्यतीत अशी गाढवं कधीही जिंकू शकत नाहीत. ठकसेन जर ह्या गाढवांना विविध संसाधनांचा लायकीपेक्षा जास्त पुरवठा करून शर्यतीत पुढे नेऊ शकतात, तर सर्वव्यापी भगवंतांना अनन्य भावाने शरण गेल्यावर भगवान आम्हांला शर्यतीत पुढे नेऊ शकणार नाहीत, असं वाटतं का काय ह्या उडाणटप्पूंना ? वैयक्तिक अहंभावापेक्षा हल्ली सामूहिक अहंभाव (collective paranoia) हाच जास्त तापदायक व्हायला लागलाय. समूहात सामील झालेलं प्रत्येक माकड स्वतःला बृहस्पती समजायला लागलं आहे.
. . . झुंडशाहीचा प्रतिकार कसा करायचा ते परमपदापर्यंत गेल्यावर कळतं. खरं तर परमपदावर जाऊन परमगती किंवा सिद्धी मिळवल्यावर बरंच काही करता येतं. पण वंशवाद्यांचा उदो करणा-या मुंडनवाल्यांना मात्र ह्यातलं काहीच आवडत नाही, रुचत नाही आणि पचतही नाही. कारण ह्या सगळ्याचा अर्थ असा होतो की कोणतीही व्यक्ती कितीही नीच योनीत जन्माला आलेली असली तरी खडतर योगसाधनेच्या क्लेशकारक मार्गावर चालत राहून स्वतःचं अध्यात्मिक बल वाढवू शकते आणि त्या उन्नत आत्मबलाद्वारे परमपदापर्यंत जाऊन सिद्धी प्राप्त करू शकते. त्यासाठी गुरूची गरज लागतेच असं नाही : 
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येSपि स्युः पापयोनयः | 
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेSपि यान्ति परां गतिम् |
अशी कोणत्याही ज्ञातीतली कोणतीही व्यक्ती परमपद मिळवू शकली तर मग वंशवादी उच्चवर्णियांचा आब तो काय राहिला ? तेव्हां मग हे वंशवाद्यांच्या तालावर नाचणारे वेदवेत्ते संपूर्ण भगवद्गीताच उलटी फिरवायला बघतात. "परमात्मा म्हणजे सर्वव्यापी, सर्वशक्तिमान परमेश्वर" अशी अधांतरी व्याख्या करून "जीवात्मा हा कधीही परमात्मा बनू शकत नाही" असं म्हणत संपूर्ण भगवद्गीतेला ते व्यावहारिक जगापासून लांब न्यायला बघतात, सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती ह्यांच्यामधल्या संघर्षापासून दूर न्यायला बघतात आणि अखेर १५ व्या अध्यायातल्या १७ व्या श्लोकाचं निरुपण करतांना ते अनेक कोलांटउड्या मारत चकण्यासारखं विवेचन करत बसतात ! असो. 
. . . वर म्हटल्याप्रमाणे झुंडशाहीला प्रभावी विरोध करण्याची क्षमता प्राप्त होणं हे परमपदापर्यंत गेल्यावर प्राप्त होणा-या एकूण क्षमतेचा केवळ एक हिस्सा आहे. भगवंतांच्या अनेक दिव्य शक्ती ह्या परमपदावर आरूढ झालेल्या व्यक्तीला वापरता येतात. इथे दिव्य शक्ती म्हणजे काय ते थोडक्यात जाणून घेऊया. पूर्णब्रह्म म्हणजे काय ते न समजलेल्या मूढमतीला भवसागराची अनेक समीकरणं ही अनाकलनीय भासतात. ह्या समीकरणांचा यथायोग्य वापर केल्यामुळेच परमपुरुष हा भवसागरात बुडत नाही :
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया | 
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते |
पण अज्ञानी मूढमती मात्र तेवढ्याच वादळवा-याचा सामना करता करता गटांगळ्या खायला लागतो आणि अखेरीस बुडतो. त्यामुळेच अशा अज्ञ मठ्ठोबांपुढे तुम्ही परमपदावरच्या दिव्य शक्तींचं कितीही वर्णन केलंत तरी त्यांना ते पटत नाही, समजत नाही कारण अहंकाराच्या भुश्याने भरलेल्या त्यांच्या कवट्यांमधल्या मेंदूची तेवढी क्षमताच नसते. त्यामुळे "जीवात्मा हा कधीही परमात्मा असू शकत नाही" एवढंच तुणतुणं वाजवत ते तुमचा प्रतिवाद करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत रहातात.
. . . परमपदावर आरूढ झालेल्या परमपुरुषाला भगवंतांच्या अनेक दिव्य शक्ती यथास्थित वापरता आल्या की अशा परमपुरुषाला सिद्धी प्राप्त झाली असं म्हणता येतं : 
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् | 
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः |
थोडक्यात सांगायचं तर अशा परमगतीला प्राप्त झालेला परमपुरुष म्हणजे व्यावहारिक पातळीवर, मनुष्यदेहाच्या मर्यादांचं उल्लंघन न करता वास्तवात उतरवता येऊ शकणारं साक्षात् भगवत्स्वरूप ! हॉलिवूड चित्रपट Insurgent मधे अशा परमपुरुषाला 100% divergent म्हणून संबोधलं आहे. अर्थातच ते निरीश्वरवादी चौकटीतून केलेलं विश्लेषण आहे. जिनी गटातल्या ठकसेनांना असा 100% divergent कधीही सापडू शकत नाही कारण :
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः | 
मूढोSयं नाभिजानाति लोको माम् अजम् अव्ययम् |
हे भगवंतांना लागू असणारं वचन साक्षात् भगवत्स्वरूप अशा परमपुरुषालाही काही अंशी लागू पडतं !
. . . मनुष्यदेहाच्या मर्यादांचं उल्लंघन हे कोणालाच करता येत नाही. स्वतः भगवंतांना जरी ते शक्य असलं तरीसुद्धा जेव्हां ते पृथ्वीवर मनुष्यरूपाने अवतार घेतात तेव्हां ते ह्या मर्यादांचं भान कधीच सोडत नाहीत. म्हणूनच प्रभु रामचंद्र काय किंवा भगवान श्रीकृष्ण काय शैशवावस्था, कुमारवय, गुरुगृही शिक्षण आणि अवतारसमाप्ती अशा मायेच्या पसा-याशी सुसंगत असणा-या सर्व प्रक्रियांमधून ते जातातच. नाहीतर स्वतः भगवंतांना ज्ञानप्राप्तीसाठी मनुष्यदेहधारी गुरूची गरज का भासावी ? पण स्वतःच काही विशिष्ट नियमांच्या आधारे रचलेल्या सृष्टीच्या नियमांचं उल्लंघन स्वतः भगवान कधीही करत नाहीत. त्यामुळे असे सृष्टीचे नियम सर्वांना पाळावेच लागतात, परमपुरुष हाही त्या नियमांना अपवाद नसतो. म्हणजेच परमपुरुषाच्या पोटात सुरा खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढलात तर तो मरेल की नाही ? नक्कीच मरेल. त्या परमपुरुषाला विष पाजलंत तर तो मरेल की नाही ? नक्कीच मरेल. "दिव्य शक्तींचा वापर करून मुडद्याला जिवंत करून दाखव" असं जर परमपुरुषाला सांगितलंत तर ते काम तो करू शकेल की नाही ? कदापि करू शकणार नाही.